आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर ? हे करा .

मित्रानो, ज्या वेळेस प्रत्येक मनुष्य जन्माला येतो त्या वेळेस आई वडिलांना खूप आनंद होतो, खरं सांगायचं झालंच तर आईवडील हे मुलांसाठी आपले आयुष्य पणाला लावतात , पण मित्रानो आपण खरंच किती सिरिअसली घेतो आपलं आयुष्य , व आपण कधी आपल्या आई वडिलांच्या विचारांचा व त्याच बरोबर त्यांनी बघितलेल्या स्वप्नांचा विचार करतो का ? असा प्रश्न स्वतःला कधी आपण विचारलात का ?

नसेल विचार केला तर आज पासून करायला लागा. आयुष्य खूप काही आहे ते समजावून घेण्याचा प्रयत्न करा .

१) तुमच्या जीवनाचे ध्येय निश्चित करा. जर तुह्मी ध्येय निश्चित केले नाहीतर तुह्मी आयुष्य भर भटकत राहाल , आणि आता मी सांगतो कि ध्येय म्हणजे काय ? ध्येय म्हजे जे कि ते तुह्माला झोपू देत नाही, वाईट काम करायला लागले कि आपले ध्येय आपल्याला जागे करून देते कि नाही माझं ध्येय हे माझ्या आई वडिलांसाठी आहे. जर मी वाईट काम केलं तर मी बघितलेलं ध्येय व माझ्या आई - वडिलांचे ध्येय मी कधीच पूर्ण करू शकत नाही. व आपण आपल्या मनाशी बाळगलेले ध्येय आपल्या संपूर्ण आयुष्याला एक आकार देऊन जात .


एक उदाहरण म्हणून सांगायचं झालाच तर रस्त्याने ज्या वेळेस आपण चालत असतो त्या वेळेस जर आपल्याला कुठे जायचं ते माहीतच नसेल तर आपण कितीही दिवस चालत राहिलो तरी आपण कोठेच पोहचणार नाहीत , तसेच आयुष्याबाबत हेच आहे, कितीही दिवस आपण जगलो तरी आयुष्यात काहीच करू शकत नाही, म्हणून स्वतःसाठी नाही तर कमीत कमी आई वडिलांना डोळ्यासमोर ठेऊन आपली ध्येय निश्चिती आजच करा कारण वेळ हि कोणासाठी थांबत नाही. थांबत असतो तो फक्त मनुष्य प्राणी .