इन शेड ऑफ इंडियन फ्लॅग, एकदा अवश्य वाचा



राष्ट्रभक्ती ही मनात असावी आणि त्याची प्रचिती मात्र आपल्या कृती मधून यावी असे मला वाटते . पुण्यातील  खडकी मधीन मिलिट्री इंजिनीरिंग कॉलेज च्या बाहेर गेट शेजारी खूप मोठा तिरंगा आहे . जेव्हा पण तो मोठा तिरंगा पहायचे तेव्हा मनात यायचं की याची सावली किती मोठी पडत असेल ? एकदा तरी याच्या सावली 2 मिनिटं उभं राहायला मिळावं बस्सस ....... म्हणजे अगदी "Airlift" पिक्चर मधलं "तू भूला जिसे.. तुझको वो याद करता राहा ...... " हे गाणं आठवत आणि त्यातली अक्षय कुमार ची परिस्थिती ....  तेव्हा समजतं "How to feel in shade of Indian Flag " खरंच आपण भारत देशाच्या सावलीत सुखरूप आहोत . भारतावर अनेक अतिरेकी हल्ले झाले पण भारतीय सैनिकांनी  आपल्या जीवाची पर्वा न करता आपलं सरंक्षण केलं फक्त आपला जीव धोक्यात येऊ नये म्हणून . 

दरवर्षी 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट आले की रस्त्यावर दोन्ही बाजूला राष्ट्रध्वज विक्रीस ठेवलेले दिसतात . आणि जो तो आपल्या परीने हे दोन राष्ट्रीय दिन साजरा करतो पण मला असे वाटते की या दोन दिवशीच राष्ट्रीय दिवस साजरी न करता रोज आपण आपल्या देशासाठी काहीतरी करावे जसे की रस्त्यावरून जाताना शिस्त पाळणे , मदत करणे ,त्याच प्रमाणे प्रत्येक लहान मुलात देशभक्ती ची ओढ निर्माण करणे हे आपले काम आहे नाहीतर काही दिवसानी देशभक्ती ही फक्त सैनिकांसाठी आहे असाच चित्र दिसेल अशीच अजून खूप काही . एक छोटी सुरवात स्वतः पासुन करायला हरकत काय आहे??? म्हणुनच नवीन वर्ष आणि एक नवीन संकल्प देशासाठी

37 views0 comments