एक भय - सत्य असेही..........ती हि अशीच लहान मुलींसारखीच म्हणजे खरे तर असेल २२ वर्षांची पण खेळणे, बागडणे लहान मुलांसारखेच... इंजिनीरिंगच्या ३ऱ्या वर्षाला शिकत होती. आई - वडिलांपासून दूर दुसऱ्या शहरात शिकण्यासाठी गेली होती. व्यवस्थित होत्या सर्व गोष्टी..

आपण काही गोष्टी मानत नाही जस कि भूत, आत्मा अशा... म्हणजे मनुष्य गण असतो आपल्या कुंडलीमध्ये, सर्वांच्या नाही पण असतो एखाद्याच्या... मनुष्य गण असला कि काय होते हे बहुतांशी लोकांना माहित असेलच... हा गण असणाऱ्या लोकांना भूत, आत्मा ह्या गोष्टी दिसतात आणि काही वेळेस मागेही लागतात... तसाच काहीसा घडलेला हा प्रकार प्रियासोबत...

प्रिया सेमिस्टर एक्साम झाल्यानंतर घरी आलेली सुट्ट्यांसाठी... घरी २ ३ दिवस झाल्यानंतर आई पप्पांनी कुठेतरी देवदर्शनासाठी जाण्याचा प्लॅन बनवला... तर हे सर्वजण दुसऱ्यादिवशी सकाळी पॅकिंग करून प्रवासासाठी निघाले...प्रवास एकदम छान.. सुंदर असं वातावरण.. गप्पा छान रंगल्या होत्या....दूरचा प्रवास होता डोंगर, घाट, बोगदा यासर्व गोष्टींचा आनंद घेत निघाले होते.... ३ ते ४ तास झाल्यानंतर प्रिया कंटाळा आल्याने झोपली...तासाभरातच ते सर्वजण दर्शनासाठी पोहचणार होते...

लवकरच ते सर्वजण पोहचले दर्शन झाले... सर्व काही व्यवस्थित पार पडल्यानंतर सर्वजण घरी आले.. जवळजवळ सुट्ट्या संपतच आल्या होत्या.. सुट्ट्या संपल्यांनंतर प्रिया पुन्हा हॉस्टेलला गेली... त्यानंतर तिच्या वागण्यात खूपच फरक जाणवत होता.. म्हणजे मैत्रिणीसोबत जास्त रहात नव्हती.. एकटी एकटी असायची खूप चिडखोर झाली होती ती....एके रात्री ती रूम मध्ये असताना अचानक तिने ओरडायला सुरवात केली मुलींच्या अंगावर धावून गेली... तिचे ते अक्राळविक्राळ रूप पाहून सर्व जण घाबरले होते... ती मोठमोठ्याने रडत होती न ओरडत होती कि मला शिर्डीला जायचं आहे - शिर्डीला जायचं आहे...

हा सर्व प्रकार तिच्या घरच्यांना सांगण्यात आला तेव्हा ते तिला घरी घेऊन गेले.. त्यानंतर तिला भूतबाधा झाली आहे असं समजलं... म्हणून एका मांत्रिकाकडे तिला नेण्यात आलं.. तिथे गेल्यानंतर मांत्रिकाने विचारलं कि तुम्ही बाहेर कुठे गेलेलात का मुलीला घेऊन तेव्हा घरच्यांनी जे सुट्ट्यांमध्ये नि सुट्ट्यानंतर झालं ते सर्वकाही सांगितलं... तेव्हा त्यांनी तिला भूत बाधा झाली आहे असे सांगितले.. प्रिया आणि घरचे ज्या मार्गाने देवदर्शनासाठी गेलेले त्या घाटामध्ये आदल्याच दिवशी एक अपघात झालेला ज्यामध्ये पूर्ण एका परिवाराचा मृत्यू झालेला ज्यामध्ये प्रियाच्याच वयाची मुलगी होती सर्वजण साईंच्या दर्शनासाठी निघाले होते पण काळाने घात केला न सर्व कुटुंब मृत्यूला सामोरे गेले... त्या मुलीची इच्छा अपूर्ण राहिल्याने त्या दिवशी प्रियाच्या शरीराचा ताबा घेऊन ती आपली इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होती....

म्हणजे भुतांवर विश्वास जरी नसेल आपला तरी खूप अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्या आजूबाजूला घडत असतात....