घरातल राजकारण:भाग पहिला
दिवसभराच्या कटकटी तुन संध्याकाळी दिवस संपला कि आपल्या घरात t.v चालू होतो . मग t.v वरच्या

कटकटी चालू होतात त्या कटकटी आपल्या घरातील लोक अगदी उत्साहाने पाहत असतात अर्थात t.v

वरच्या मालिका . जेवताना बाकीच्या गोष्टी बोलायच्या ऐवजी या मालिके वरच्या गप्पा खूपच रंगतात

अगदी

" अग बघ ना तिने अस केला "पासून ते " खरंच त्याला अक्कल नाही " इथपर्यंत. बारीक निरीक्षण

केला असता या सगळ्या मालिकेचा पाया हा घर आणि घरातले प्रॉब्लेम्स आणि ते प्रॉब्लेम्स सोडवायच्या

नादात मालिकांचे वाढत चाललेले कित्येक भाग . या मालिका एका विशिष्ट कथेवर आधारलेल्या असतात

पण त्यात प्रत्येक घरात चालणार वेगवेगळ "राजकारण " . मग घरातल राजकारण महत्वाचा भाग

होऊन जातो . आजकाल बाहेरच्या दुनियेसोबत लढणं फार सोपं झालाय पण आपल्यातच घरातील

लोकांसोबत लढणं फार अवघड झालाय . घरातील प्रत्येक जण वेगवेगळ्या स्वभावाचा असतो तरीही

एकमेकांसोबत जुळवून घेऊन आपण राहतो पण कधी कधी अशी परिस्तिथी येते कि आपलेच लोक

आपल्या निर्णयाच्या विरुद्ध असतात . या घरातल्या राजकारणातूनच तर इतिहासातील महान ग्रंथ "

महाभारत " आणि " रामायण " निर्मिती झाली . देव काय दानव काय कोणी यातून सुटू शकले नाही

आपण तर खूप लांबची गोष्ट .

आपल्या घरात प्रत्येकाला आपण किती वेगळा आणि कर्तव्यदक्ष आहोत याची हे सिद्ध करण्याची स्पर्धा

असते यातूनच " घरचे राजकारण " चा जन्म होतो त्याला खतपाणी घालणारे आणि आगीत तेल ओतून

तिला भडकवण्याचे काम करणारे आपलेच नातेवाईक लोकांना आपल्या गोष्टीत इंटरेस्ट फार . या घरगुती

राजकारणाचा त्रास सगळ्यांना चांगलाच होतो . यातील काही गोष्टी बंद करणे आपल्या हातात नसत पण

आपण कमी मात्र नक्कीच करू शकतो . आजच्या या धावपळीच्या युगात कोणाला कोणासाठी वेळच

नाही आहे. नात्यातील संवाद आपुरा असल्यामुळे माणसातील माणसांण मधील दुरावा वाढत चालला आहे

त्या नुसार घरातले प्रॉब्लम्स पण वाढत चालले आहेत टिपिकल एकाद्या मराठी मालिके सारखा . अनेक

घरं आणि अनेक कुटुंबं त्यांच्या जगण्याच्या वेगवेगळ्या कहाण्या. त्यांचे जगण्याचे, परस्पर नातेसंबंधांचे,

व्यक्तिगत अपेक्षांचे, परिस्थितीतून निर्माण होणाऱ्या घटनांचे धागे-दोरे एकमेकांत गुंतून निर्माण होणारे

ताणतणाव.

अजून नंतर बघुयात दुसऱ्या भागात