छत्रपती शिवाजी महाराजांना" मानाचा मुजरा"क्षत्रियकुलावतसं" हा शब्द कानावर आला की डोळ्यासमोर येतात ते अखंड मराठी साम्राज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज . क्वचितच अस कोणी इसम असेल ज्याला शिवाजी महाराजांची माहिती नसेल . त्यांच्या बद्दल बोलू तेवढे कमीच पण हल्ली मराठी माणसाच्या मनातील "मराठी अस्मिता " खूपच वाढू लागलीये . आणि जगाच्या बाजारात आज मराठी ला इंग्रजी एवढेच महत्व मिळाले आहे . ते शिवाजी महाराजांनी स्वराज्य आणले म्हणून नाहीतर त्या काळी मोघलांनी मराठी माणूस अस्तित्वात च ठेवला नसता आणि परकीय लोकांनी भारतात आपले बस्तान मांडले असते समुद्रात भव्य आरमार उभे करून इंग्रज आणि पोर्तुगीजावर वचक बसवला आणि महाराष्ट्र सुरक्षित केला . निश्चयाचा महामेरू म्हणून शिवाजी महाराजांची ओळख आहे . आजच्या काळात आपण मराठी आरक्षण वरून भांडत आहोत पण त्या काळात  शिवाजी महाराजांनी मुलींना 50℅ "आरक्षण" न देता 100%टक्के "संरक्षण" दिले .आज सर्व सुविधा आणि तंत्रज्ञान असताना आपण दहशतवाद नष्ट करण्यास असमर्थ आहोत  आज शिवनीती अंमलात आणली तर भारताच्यासमोरचे  प्रश्न मार्गी लागतील. शाहिस्तेखानाची बोटे तोडून पहिला  "सर्जिकल स्ट्राईक " करणाऱ्या "छत्रपती शिवाजी  महाराजांना" मानाचा मुजरा