परीक्षा आणि त्याआधीचा अभ्यास!!बारावीची परीक्षा चालू झाली असून प्रत्येकाच्या घरात कोणी ना कोणी बोर्ड exam देत असत . घरातींल मोठी माणसे रोज नवीन नवीन सल्ले देत असतात

परीक्षेत फक्त चांगले गुण खूप अभ्‍यास केल्याने मिळतात या गैरसमजूतीत राहू नये या साठी ते प्रयत्न करत असतात. पण हे प्रयत्न यशस्वी करण्यासाठी अभ्‍यास पध्‍दत महत्त्वाची आहे.अनेक तास अभ्‍यास करुनही चांगले गुण मिळत नाही.तेथेच तुमचा मित्र नियोजनपूर्वक आणि कमी वेळेत अभ्‍यासाने भरपूर गुण मिळवतो.वास्तविक रात्र-रात्र जागून अभ्‍यास करणे हे परीक्षेत चांगल्या गुणांची गॅरंटी नाही.उलट अभ्‍यासासाठी किती स्मार्ट सवयींचा वापर केला यावर अवलंबून असते.खरे म्हणजे योजनापूर्वक आणि फोकस्ड पध्‍दतीने करण्‍यात आलेला अभ्‍यास तुम्हाला चांगला रिझल्ट देईल आणि तुमच्या ज्ञानातही भर पडेल. काही खास गोष्टी म्हणजे कोणताही chapter option ला न टाकता समजून घ्यावे . जरा दिवस tv computer या गोष्टी पासून दूर राहावे.आताची तरूण पिढी social site तसेच अँड्रॉइड फोन ला addicted आहे . त्यावर थोडे बंधन घालणे गरजेचं आहे थोडक्यात लगेच लक्ष्यात येतील आणि पटकन वाचता येतील अशा नोट्स काढावं . तसेच परीक्षेसाठी जाताना शक्यतो घरातील मोठया व्यक्ती सोबत जाव. शक्य नसेल तरी slow driving करत जाव या साठी लवकर निघावे . जेवण व नाश्त्या च्या वेळा पाळाव्यात . एखादा पेपर अवघड गेला तरी tension न घेता next paper चा अभ्यास करावा .