पस्तावण्यापूर्वी नक्की वाचा!

जुन च्या पहिल्या आठवड्यात दहावी आणि बारावी चे निकाल लागतील . कुठे ऍडमिशन घायची किंवा भविष्यात कुठे करिअर करायचंय त्या base वर आपण कॉलेज आणि आपल्या आवडीचं करिअर निवडायचं असतं .पण नेमका अशी अवस्था होते की ऑपशन प्रचंड , माहिती भरपुर पण आपले निर्णय शून्यात गेलेले असतात. मनात खूप गोंधळ होतो आणि मग भलताच ऑपशन निवडून आपण सुरवात करायला पाहतो. हे सर्वच टाळण्यासाठी आपण काही उपाय नक्कीच करू शकतो जे ने करून आपला मार्ग सोयीचा होईल कारण bright carrer तर निवडलं पण कॉलेज कस असेल?त्या साठी कोणते निकष वापरण्यात यावेत ? अभ्यासक्रमाला मान्यता आहे का? फी माफी मिळेल का?प्लेसमेंट खरच मिळेल का? या सारखेच अनेक प्रश्न सगळ्यांच पडतात म्हणून थोड्यात काही महत्त्वाचे टिप्स 1. प्रवेश प्रक्रिया माहीत करून घेणे 2. मेरिट लिस्ट सोबत आपले मार्क्स पडताळून पाहणे. तसेच मागील वर्षीच्या cutoff चा विचार जास्त करणं. 3.आवडलेल्या कॉलेजेस चा मागील वर्ष चा प्लेसमेंट रेकॉर्ड पाहणे तसेच त्यानुसार कॉलेज चॉईस करणे 4.आपण निवडलेल्या कॉलेज ला मान्यता आहे का तसेच कोणतया युनिव्हर्सिटी under ते कॉलेज येत त्याची चौकशी करने. 5. निवडलेल्या कॉलेज ची फी आपल्याला परवडणारी आहे का ?हे पाहावे . 6.आपल्याला स्कॉलरशिप मिळेल का ? हे पाहावे . 7. मोठ्या शहरात शिकण्याची क्रेझ जरी असली तरी आपल्याला ती परवडणार आहे का?हा विचार नक्की करावा . 8. बाहेर गावी राहून शिक्षण घेणार असू तर आधी हॉस्टेल ची नीट चौकशी करावी.  9. आपण निवडलेल्या कॉलेज मध्ये कोणत्या ऍक्टिव्हिटी होतात किंवा आपल्या आवडीच्या कोणत्या ऍक्टिव्हिटी करता येतील का? हा पण विचार कराव कारण आपण फ़क्त अभ्यासू किडा नसतो तर स्पोर्ट्स आणि बाकी गोष्टी पण करत असतो. 10.आपण ज्या शाखेला प्रवेश घेणार आहे त्याच्या सोबत अजून काही शिकता येत का?म्हणजे अडडिशनल कोर्स वगैरे करता येतो का?  या सर्व बाबतीत आपण जर सजग राहिलो तर बरचसं आपण आपल्या वयक्तिक पातळी वर आपले प्रश्न सोडवू शकतो आणि एक उत्तम करिअर घडवू शकतो आपल्या ज्या गोष्टी महत्वाच्या वाटत आहेत त्या नुसार निर्णय घ्यावा पण निर्णय हा विचारपूर्वक आणि अगोदरच घेतला गेला पाहिजे . चला तयारी ला लागा !!!!!

20 views0 comments