फक्त मतदान करायचंय !!!अवघड काय त्यात ??एप्रिल2019 अर्थात निवडणूक आणि मतदानाचा महिना .प्रत्येक पक्षाने आपल्या कडून  उमेदवार जाहीर करून प्रचार सुद्धा सुरू केला . Tv , वृत्तपत्र , सोशल साईट सुद्धा यांच्या प्रचाराच्या फेऱ्यातून सुटल्या नाहीय . या सर्वात सामान्य माणूस अगदी गोंधळात पडतो आणि यामुळेच NOTA ला मतदान होते किंवा काहीजण मतदानाची सुट्टी बाहेर फिरायला घालवतात , किंवा काहींना आजिबात इंटरेस्ट नसतो . हे चुकीचे आहे आपण स्वतंत्र भारताचे जबाबदार नागरिक आहोत आपल्या मतदानावर पूर्ण भारताचा कारभार चालतो . मतदान हे आपले कर्तव्य आहे त्यात अशी चूक करून कसे चालेल??? कोणाला मतदान करावे या गोंधळात न पडता जरासा बारीक विचार करावा . गेल्या 5 वर्षात आपल्या आजूबाजूला झालेले चांगले वाईट बदल ,ट्राफिक प्रॉब्लेम, कचरा निवारण पद्धती , इतर सेवा यांचा नीट पुरवठा झालेला आहे की नाही तसेच मतदान करताना " उघडा डोळे ...बघा नीट " याचा वापर केला की सगळं सोप आहे . आपल्या हिताप्रमाणे देशाच्या हिताचा देखील विचार करावा .. पक्ष न पाहता माणूस बघून मतदान करण्यात जास्त शहाणपण आहे अस मला वाटत ... असा प्रत्येकाने विचार केला तरच भ्रष्टाचाराला चांगलाच आळा बसेल आणि देश प्रगतीचा मार्गावर चालेल 

28 views0 comments