घरातल राजकारण: भाग तिसराकुटुंबाला अडचणीत आणतात. याच सगळ्या ताणतणावांमुळे व्यक्तींवर होणारे परिणाम कौटुंबिक जीवनातही अनेक प्रश्‍न निर्माण करतात.

साऱ्यांच्या परस्पर नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम होतो. हे बिघडलेले नातेसंबंध आणखी ताणतणाव वाढवतात. एक दुष्टचक्र तयार होतं. एका छपराखाली, एका घरात राहणारी माणसं व्यक्तिगत बेटांवर राहिल्यासारखा अनुभव घेऊ लागतात. प्रेम, सहकार्य, आपुलकी आणि शेअर करणं-वाटून घेणं, विश्‍वास वाटणं - हा चांगल्या नातेसंबंधांचा पाया डळमळीत होतो. शेवटी घरं मोडतात, कुटुंब विखुरतात आणि माणसं दुरावतात याच सगळ्या कौटुंबिक राजकारण चा शेवट कधी चांगला होतो तर कधी वाईट यावर नियंत्रण हे असलेच पाहिजे त्या साठी कौटुंबिक जीवनात आनंद कसा निर्माण करता येईल, याचा विचार कुटुंबातल्या प्रत्येकालाच हवा. ती घरातल्या एका-दोघांचीच जबाबदारी नाही. सगळ्या कुटुंबाचीच प्रगती साधायची असेल, तर कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याची प्रगती झाली पाहिजे. निकोप वाढ झाली पाहिजे. ती होण्यासाठी प्रत्येकाला वेळ आणि जागा (स्पेस) मिळायला हवी. ती तशी मिळावी, म्हणून कुटुंबातल्या प्रत्येकानं सहकार्य करायला हवं. तडजोड करायला हवी. नव्या बदलांना सकारात्मकतेनं सामोरं जायला हवं. "कमी तिथं आम्ही' हा मंत्र वसा घेतल्याप्रमाणं प्रत्येकानं जपायला हवा. मग आपल्यातला "मी' कुटुंबाला कवेत घेतो. आणखी विस्तारतो. "वसुधैव कुटुंबकम्‌' म्हणतो आणि त्याही पुढं जाऊन विश्‍वाचा अंश स्वतःमध्ये पाहू लागतो

व्यक्तिगत ताणतणावांचं मूळ कारण शोधून त्याबाबत उपाय करता येतात. नकारात्मक परिणाम न होता, अधिक ताण निभावता येईल, सकारात्मक विचारांची सजगता, विचारांत तारतम्य आणि विवेक राखणं, चांगल्या हिताच्या कृती करणं, चांगल्या उपयुक्त सवयी लावणं, मनाचं आणि शरीराचं आरोग्य राखणं अशा अनेक गोष्टी करता येतात. परस्पर नातेसंबंध सुधारण्यास मदत होईल, सकारात्मकता वाढेल अशा चांगल्या सामूहिक कृती कौटुंबिक स्तरावर करता येतात. सण, उत्सव, कार्यक्रम सर्वांनुमते मिळून साजरे करणं, हा एक चांगला उपाय आहे. हा काय वैताग आहे, असं न मानता सर्वांनी त्यात उत्साहानं भाग घेतला, की ते सण-उत्सव-कार्यक्रम आनंददायी होतात. प्रत्येक कुटुंबाचे काही नियम, शिस्त असते. उदा. बाहेरून आल्यावर हात-पाय धुवावेत, सकाळी उठल्यावर सर्वांनी एकत्र चहा- नाश्‍ता करावा,रात्रीचे जेवण घरातच एकत्र घ्यावं, सर्वांनी ठराविक वेळी पाच-दहा मिनिटं प्रार्थना करावी, एकत्र फिरायला, हॉटेलमध्ये, पर्यटनाला जावं. व्यक्तीचा दिनक्रम चांगला असला, की दिवसभराच्या जगण्याला चांगला आकार येतो; तसंच कुटुंबाचा काही दिनक्रम असला, की त्या कुटुंबाच्या कौटुंबिक जीवनालाही आकार येतो. एकत्र येण्यानं प्रत्येकाची कुटुंबाबद्दलची ओढ आणि आपुलकी वाढते. हे सगळं दोन-चार दिवसात होत नाही. काही काळानंतर त्याचे उत्तम परिणाम दिसू लागतात. हे कौटुंबिक शिष्टाचार "मी म्हणतो म्हणून' अशा भूमिकेतून न ठरवता सगळ्यांच्या चांगल्यासाठी-आनंदासाठी आहेत म्हणून ठरवोत.