मनातले स्वप्न !!माणसाची स्वप्न किती वेगवेगळी असु शकतात ना .ती स्वप्न जो पर्यंत पुर्ण होत नाहीत तो पर्यत शांती मिळने अशक्य .आजपर्यंत नशीबाने माझ्या भाग्यात काही प्रिय गोष्टी कधीच आल्या नाहीत .बाहेर हा बरसत असलेला पाउस पहिला कि मनात असलेले माझे स्वप्न मला सारखे छळुन काढत असते .मनातले स्वप्न जास्त मोठे नाही पण तरी सुद्धा पुर्ण अजुन तरी झालेले नाही . धो धो पाउस असावा या पावसात bike वर  "तो" आणी "मी" . पावसात भिजायला "तो" सुद्धा माझ्याएवढा हौशी असावा मग तो long drive  वाला रोड असावा ..सगळी कडे हिरवळ ..डोंगर आणी टेकड्या मधुन जाणारा तो रस्ता त्यात भर म्हणुन पाउस असावा . पावसात चिंब भिजल्यानंतर त्याने bike एका चाय टपरी समोर आणुन कुडकुडत चहा आणी भजी माझ्या सोबत share करावी .. बाहेर चा पाउस थांबे  पर्यंत माझ्याशी खुप सारया गप्पा मारयाव्यात ..हा दिवस आणी हा पाउस कधी संपुच नये अस वाटाव .. प्रेम म्हणजे या पेक्षा वेगळ असत का काही ??? स्वता पेक्षा समोरयाच्या व्यकती मधे हरवुन जाणे कदाचीत यालाच प्रेम म्हणत असावे .. असे दुर्मिळ क्षण माझ्या आयुष्यात अजुन तरी आले नाहीत ... पाउस पाहीला की सगळी स्वप्न जागी होतात आणी पुर्ण होण्याची वाट पाहात राहतात....

52 views0 comments