माझी आई ...तुझी आईमाझ्या जन्मदात्या आईची सर कुणालाच येणार नाही पण तरी तुझ्या आईचं आयुष्यातलं महत्व कमी कधीच होणार नाही. माझ्या आईची गोष्टच वेगळी तिच्या कुशीतलं रोपटं ती हळुवार जपते पण कर्तव्यदक्ष गृहिणी घडवण्यासाठी तुझी आई कठोर वागते. ताणल्याशिवाय तुटत नाही अन एक हाताने टाळी वाजतच नाही ..असं एकतरी घर दाखवा बघू जिथं भांड्याला भांड लागत नाही. माहेरच्या मातीतील तुळस जोवर सासरच्या अंगणात रुजत नाही तोवर तुलना होणारच ना माझी आई आणि तुझी आई..


तुझ्या आईचे अनुभव, तिचे कष्ट याचे भान ठेवलं म्हणजे घराच्या रंगमंचावर होणारच नाही नाटक, मानापमान..सोबत माझ्याही आईलाही देऊयात ना मानाचे स्थान.. तुझ्या आईचा मोठा पाठिंबा घरादाराला त्याचाच आधार.. मुलं तिच्या स्वाधीन करून ती सांभाळते घरसंसार....पण माझ्याही आईचा आहेच ना यात मोठा हातभार..


माहेरची जाईजुई बहरुन सासरच्या मंडपावर चढते ..माझ्या आई इतके कौतुक तुझी आईहि करते....

माझी आई, तुझी आई न करता..तुझी आई हि माझी आई .... माझी आई हि तुझी करू...सासू सुनेच्या नात्यात थोडी साखरेची गोडी भरू..

125 views0 comments