मुलांचा इंडो वेस्टर्न लुक
तुलसीविवाहनंतर लग्नसराईचा बार उडणार आहे. लग्नसराईमध्ये हटके दिसण्यासाठी वर-वधुंसह सर्वच नवनवीन प्रकारचे कपडे खरेदीसाठी लगबग करणार आहेत

खरेदीच्या घाईत मुली आघाडीवर असल्या तरी मुले यात मागे नाही. बाजारात सध्या ट्रेण्डमध्ये देसी लुकला पसंती दिली आहे. यासाठी बाजारात इंडो वेस्टर्न सुटला अधिक पसंती दिली जात आहे.बाजारात नवनवीन प्रकारचे कपडे, वस्तू आणि आकर्षक सवलतींसह दिवाळीनिमीत्त सजला होता. आता तुळसी विवाहानंतर लग्नसोहळ्यासाठी बाजार सजला आहे. यामध्ये महिलांच्या पारंपारीक पोशाखसह पुरुषांच्या कलेक्शनवर वेगवेगळे प्रकार बाजारात दाखल झाले आहेत.सध्या ट्रेण्डमधील पुरुषांच्या कलेक्शनमध्ये इंडो वेस्टने सुटला अधिक मागणी आहे. शर्ट, टी-शर्ट आणि पँट यांच्यापुढे मुलांच्या कपड्यांची यादी जात नाही. पण, आता जमाना या यादीच्या पुढे कधीच गेला आहे. त्यामुळे यंदा खास फेस्टिव्हल सिझनसाठी बाजारात बॉलीवूड स्टाइल फेस्टिव्ह लुकपासून ते थेट पारंपरिक लुकपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे मेन्सवेअर कलेक्शन्स दाखल झाले आहेत.नेहरू जॅकेट कधीच ट्रेण्डमधून जात नाही. यंदाच्या सीझनमध्ये पिंट्रेड, शॉर्ट नेहरू जॅकेट्स प्रामुख्याने पाहायला मिळत आहे.ही जॅकेट्स स्ट्रेट पँटवर सहज वापरता येत असल्याने त्याला मागणीही आहे. सध्या नेहरू जॅकेटसोबत पटियाला, धोती पँट घालायचा ट्रेण्ड आहे. यंदा वेस्ट्सचाही पर्याय आहे.

वेस्ट हे मुख्यत्वे थ्री पीस सूट सोबत दिसत आहेत. पेस्टल शेड्सच्या कुर्त्यांसोबत नेव्ही ब्ल्यू, राखाडी, काळा, वाईन रंगाचे वेस्ट वापरता येतील. सध्या सेल्फ कलर पिंट्रचे वेस्ट बाजारात आले आहेत. वेस्ट किंवा मोदी जॅकेट्सची खासियत म्हणजे हे स्लीव्हलेसची फॅशेन रुढ होत आहे.एरवी जीन्स, ट्राऊझरच्या प्रेमात असलेली मुलं आवर्जून सलवार, धोती अशी वेगळी वाट चोखाळतात. त्यामुळे बाजारातसुद्धा पतियाला, जोधपुरी पँट, धोती पँट, स्ट्रेट सलवार, कॉटन पँट असे वेगवेगळे पर्याय सध्या पाहायला मिळताहेत. क्रीम, सफेद, बिस्कीट, मरून, नेव्ही, मेहंदी, ब्राऊन, काळा अशा वेगवेगळ्या रंगांतील या पँट्स वेगवेगळ्या कुर्त्यांसोबत वापरतांना मुले दिसत आहेत.

सध्या फिटेड पँट्सपेक्षा घेरेदार पँट्स अधिक पसंत केल्या जात आहेत. मुलींप्रमाणेच मुलांच्या ड्रेसिंगमध्येसुद्धा मॅचिंग ड्रेसिंग ट्रेण्डमध्ये आहे. एकाच रंगाच्या एक किंवा दोन शेड्सचा वापर करून ड्रेसिंग केलं जातं. त्यामुळे कुर्ता, सलवार निवडताना त्यांचं मॅचिंग तपासून घेतले जात आहेत.