यशस्वी आयुष्याचा कानमंत्र : भाग 1*आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला यशस्वी होण्याची आस असते. पण, यशस्वी होणे म्हणजे नेमके काय? तर, आपल्या मनातून आपण ठरवलेले ध्येय आपण साध्य करणे म्हणजे यशस्वी होणे. पण, असे अनेक लोकांच्या बाबतीत घडत नाही. ध्येय तर हे लोक ठरवतात. पण, ते पूर्ण मात्र करू शकत नाहीत. यामागे बरे कारण काय असेल…? खरेतर येथेच मेख आहे. आपण यशस्वी का होत नाही यावर विचार करण्यापेक्षा आपण यशस्वी होण्यासाठी काय करायला हवे यावर विचार करायला हवा.

*आपल्या जीवनात आलेले अपयश हेच सिद्ध करते की, यशस्वी होण्यासाठी योग्य प्रयत्न आपण केले नाहीत. म्हणूनच यशस्वीतेकडे जीवनाला न्यायचे असेल, तर जगभरातील यशस्वी लोकांचा अभ्यास करा. त्यांच्याकडून प्रेरणा घ्या. यशस्वी होण्यासाठी त्यांनी काय काम केले किंवा काय मार्ग वापरला याचा बारकाईने अभ्यास करा. जीवनात त्यांना काम करा किंवा न करा पण त्यांचा अभ्यास नक्की करा त्यांचे मार्ग अवलंबण्याचे प्रयत्न करा.