यशस्वी आयुष्याचा कानमंत्र :भाग 10*सकारात्मक विचार कसा अंगीकारावा? तर पूर्वीच्या लोकांना रोजनिशी लिहून ठेवण्याची सवय होती. ते लोक रोजनिशीत दिवसभरातील भल्याबुर्‍या आठवणी लिहून ठेवायचे. हे ते एखाद्या विशिष्ट उद्दिष्टाने करत होते असे नव्हे, पण त्यांना ती सवय लागली होती. आपणही तेच करायचे आहे, परंतु जरा वेगळ्या पद्धतीने.

*सर्वप्रथम एक छानशी डायरी विकत घ्या. डायरीच्या पहिल्या पानावर सकारात्मक रोजनिशी असे लिहा. तुम्ही धार्मिक असाल तर त्यासोबत आपल्या इष्टदेवतेचे नाव लिहिले तरी चालणार आहे. आता त्या डायरीचे काही भाग करा. म्हणजे पहिला भागातील काही पाने भूतकाळासाठी राखीव ठेवा, दुसर्‍या भागातील अधिक पाने वर्तमानासाठी राखीव ठेवा आणि तिसर्‍या भागातील काही पाने भविष्यासाठी राखून ठेवा. पहिल्या भागात, भूतकाळात घडलेल्या सकारात्मक बाबी लिहा. दुसर्‍या भागात, वर्तमानातील रोजच्या आयुष्यातील सकारात्मक बाबी रात्री झोपण्यापूर्वी लिहा आणि तिसर्‍या भागात, तुमचे आयुष्य भविष्यात कसे असावे? तुम्हाला काय व्हायचे आहे? काय मिळवायचे आहे? या सर्व बाबी नमूद करून ठेवा, पण वर्तमानातील भाग मात्र रोज लिहिणे बंधनकारक आहे.