यशस्वी आयुष्याचा कानमंत्र :भाग 2आपल्या शरीराकडून जो व्यक्ती आयुष्यात नेहमीच योग्य कष्टाची अपेक्ष करतो, योग्य कारणासाठी आपली शक्ती खर्च करतो त्या माणसाला यशापासून कोणतीच शक्ती रोखू शकत नाही. पण जो व्यक्ती तशी अपेक्षा आपल्या शरीराकडून न ठेवता कामचुकारपणा, आळस, कंटाळा, पाट्या टाकण्याचे काम करतो, तो कधीच यशस्वी होऊ शकत नाही.

*एका रात्रीत कोणताही व्यक्ती यशस्वी होत नाही. कष्ट आणि निष्टेचे खत त्यासाठी घालावे लागते. हे सर्व करत असताना माणसाचा आत्मविश्वास कामी येतो. आत्मविश्वास ज्याच्या मनात ठासून भरला आहे. कोणतेही काम त्याला अशक्य नसते. या लोकांची कार्यपद्धती लाथ मारीन तेथे पाणी काढील अशी असते. यश अशा लोकांना लवकर भेटते.


17 views0 comments