यशस्वी आयुष्याचा कानमंत्र : भाग 4



· प्रत्येकालाच जीवनात यशस्वी व्हायचं असतं. त्यासाठी आपण आपले तास, दिवस, वर्ष कशात घालवतो हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी वेळ फुकट घालवणार्‍या गोष्टी करणं बंद केलं पाहिजे. त्याची सुरुवात म्हणून पुढच्या गोष्टी करून करू.

· सोशल मीडियामध्ये गुंतून पडू नका : सोशल मीडियावर अपडेट राहणं, फेसबुकवर नोटिफिकेशन्स पाहत बसणं, इंस्टाग्रामवर वॉल स्क्रोल करत राहणं, ट्विटरवर सतत अ‍ॅक्टिव्ह असणं आणि हे जे काही हल्ली चाललं आहे; यासाठी किती वेळ घालवायचा हे जर तुम्ही ठरवले नसेल तर कधी मिनिटांचे तास आणि तासांचे दिवस होऊन जातील कळणारही नाही. म्हणून एक तर वेळेची मर्यादा पाळा किंवा तुम्हाला ज्या वेळी सोशल मीडियाच्या जगातून बाहेर पडायचे असेल त्या वेळेचा गजर लावून ठेवा. सोशल मीडियाला एक देणगी समजा, त्याच्या आहारी जाऊ नका.