यशस्वी आयुष्याचा कानमंत्र :भाग 5



*कोणताच दिवस नियोजनाविना सुरू करू नका : यशस्वी माणसांचे प्रत्येक दिवसाचे एक उद्दिष्ट ठरलेले असते जे त्यांना त्यांच्या नितळ ध्येयापर्यंत पोहोचवते. दिवसाची To-Do-List लिहून दोन-तीन महत्त्वाच्या कामांवर फोकस करा. महत्त्वाची कामं लिहून त्यांना छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये विभागा. मग आपोआपच तुमची कामे होत जाऊन तुमची To-Do-List संपेल.

* नकारात्मक भावनांमध्ये अडकून राहू नका : जर तुम्हाला यश हवे असेल तर तुम्ही तुमचे आयुष्य सकारात्मक गोष्टी, भावनांनी भरून टाका. यशस्वी माणसे नकारात्मक विचारांमध्ये अडकून वेळ फुकट घालवत नाहीत. कोणतेही काम हाती घेताना त्याचा तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम होणार आहे ना याचा विचार करा. जर तसे नसेल तर नाही म्हणायचा विचार करा. तसेच, नाही म्हणताना संकोच करू नका, कारण कुठल्या तरी गोष्टीसाठी तुम्हाला हो किंवा नाही असाचा प्रश्‍न विचारलेला असतो. हो म्हणण्याआधी विचार करा आणि नाही म्हणताना परिस्थितीचे भान असू द्या.