यशस्वी आयुष्याचा कानमंत्र :भाग 6



*हातात नसलेल्या गोष्टींचा विचार करत बसू नका : यशस्वी लोकांना माहीत असतं की, कुठल्याही गोष्टीची नुसती चिंता करत बसण्याने काहीच गती येत नाही, विशेषत: ज्या गोष्टी आपल्या आवाक्याबाहेर असतात. त्यामुळे तुमचे विचार कृतींकडे फिरवा आणि ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्यावर लक्ष केंद्रित करा.

*नकारात्मक लोकांची संगत सोडा : असे म्हणतात की, ज्या पाच लोकांसोबत तुम्ही सर्वात जास्त वेळ घालवता, त्यांच्या स्वभावांची सरासरी म्हणजे तुमचा स्वभाव असतो. त्यामुळे तुम्हाला सर्वोकृष्ट व्हायचे असेल तर कायम सर्वोत्तम माणसांमध्ये वावरा, नकारात्मक विचार, माणसे, तसेच नकारात्मक कामांपासून तुम्ही दूर आहात ना याची सतत खात्री करा. तुम्हाला आयुष्यात उंच भरारी घ्यायची असेल तर तुमचे पाय खेचणार्‍या गोष्टींपासून सावध राहा.