यशस्वी आयुष्याचा कानमंत्र : भाग 7



*भूतकाळातील चुकांसाठी रडत बसू नका : यशस्वी व्यक्तीसुद्धा अनेक चुका करतात. प्रत्येक जणच चुका करत असतो. यशस्वी होणे म्हणजे चुकांची पुनरावृत्ती न करणे, चुकांमधून घडत जाणे आणि प्रत्येक चुकीतून अनुभव घेत राहणं. म्हणून, जेव्हा तुम्ही चुकाल, तेव्हा त्या विचारांतून बाहेर पडा, कारण भूतकाळात तुम्ही परत जाऊ शकत नाही आणि आताही रडत बसू शकत नाही. त्या अनुभवातून शिका आणि पुढे जा. तुमच्या पुढच्या वाटचालीवर लक्ष केंद्रित करा.

* इतर लोकं काय करतात याचा विचार करून ध्येयापासून विचलित होऊ नका : इतरांच्या अनुभवावरून शिकणे उत्तमच आहे; परंतु जेव्हा तुम्ही पदोपदी एखाद्याशी तुमची तुलना करू लागता, तेव्हा आपोआप तुमच्या यशाला उतरती कळा लागते. ही तुमचे विचार बदलण्याची वेळ. इतरांकडून प्रेरित व्हा; परंतु तुलना फक्त सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीशी करा, तुम्ही स्वत:.