यशस्वी आयुष्याचा कानमंत्र :भाग 8



*स्वत:ला प्राधान्य द्या : आपण सर्व जण अशा प्रसंगांतून गेलो आहोत जेव्हा कामाच्या व्यापामुळे आपल्याला पुरेशी झोप आणि व्यायाम मिळत नाही; परंतु दीर्घकालीन यशासाठी तुम्ही स्वत:ला प्राधान्यक्रमात सर्वोच्च स्थान द्यायला हवे. काही सोप्या मार्गांनी हे सहज शक्य आहे. तुमच्या दिवसाची सुरुवात तुमच्या आवडीची गोष्ट करून करा.

* व्यायाम, ध्यान, वाचन वगैरेमधील काहीही. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टींनी दिवसाची सुरुवात करता तेव्हा संपूर्ण दिवस तुम्ही आनंदी, उत्साहित आणि सुदृढ राहता.या यादीत तुमचा वेळ घालविणार्‍या गोष्टी आहेत का? जर असतील तर त्यांना तुमच्या आयुष्यातून हद्दपार करा आणि तुमच्या आयुष्याचा तुम्ही स्वत: ताबा घ्या.