यशस्वी आयुष्याचा कानमंत्र : भाग 9

*आपण सगळेच जण विशेषत तणावाने ग्रस्त असतो. सामाजिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक आघाड्यांवर आपल्याला बर्‍याचदा लढावे लागते. हे करत असताना नकारात्मक विचारांनी आपले मन ग्रासून जाते. मनात सतत नकारात्मक विचार येत राहतात.घरातील वादविवाद या सर्व गोष्टींमध्ये आपण इतके गुंतून जातो की, मनात चुकूनही सकारात्मक विचार येत नाही. आपण खूप प्रयत्न करत असतो की, या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करावं; पण आपलं मन मात्र त्याच नकारात्मक गोष्टींमध्ये रमतं.

*असे म्हणतात की, माणसावर संस्कार हे करावे लागतात, पण कुसंस्कार करावे लागत नाहीत. ते आपोआप होतात. माणसाचे मन असेच आहे; परंतु जर वेगळ्या प्रकारे आपण प्रयत्न केला तर मात्र आपण मनाला शिस्त लावू शकतो. शाळेत असताना एखादा अभ्यास आपल्याला नाही जमला तर शिक्षक ते काही वेळा लिहून काढायला सांगायचे. मग तो विषय आपोआप आपल्या लक्षात यायचा. केवळ विचार करण्यापेक्षा एखादी गोष्ट लिहून काढली तर लक्षात ठेवणे सोपे जाते. म्हणून आपण नकारात्मक विचार थांबवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा सकारात्मक विचार अंगीकारणे कधीही उत्तमच आहे.

5 views0 comments