व्हेनेझुएला मधली मनीबॅग,नक्की काय आहे चला बघुयात तरव्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. व्हेनेझुएलाच्या पश्चिमेला कोलंबिया, दक्षिणेला ब्राझील, पूर्वेला गयाना हे देश तर उत्तरेला कॅरिबियन समुद्र आहेत. व्हेनेझुएलाला २८०० किमी लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे. भारताबरोबरच जगात इतरही देशात मोठ्या प्रमाणात महागाई असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.  व्हेनेझुएलाची पार्श्वभूमी व्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिकेतला तेलसंपन्न देश. तिथे जगातले सगळ्यांत मोठे तेलसाठे आहेत. पण काही वर्षांपूर्वी खोऱ्याने पैसा कमवणारा हा देश आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी आभासी चलन म्हणजेच व्हर्च्युअल करन्सी आणण्याची घोषणा केली आहे. व्हेनेझुएला येथील तेल, गॅस, सोने आणि हिरे यांचं पाठबळ या चलनाला राहील असं त्यांनी सांगितलं. विरोधकांनी मात्र या घोषणेला तीव्र विरोध केला आहे. तेलापासून मिळणारं उत्पन्न कमी झाल्यानं व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे, तसंच बोलिवर या व्हेनेझुएलाच्या चलनाची किंमत झपाट्याने कमी होत आहे. अमेरिकेने घातलेल्या निर्बंधावरसुद्धा त्यांनी सडकून टीका केली आहे. या निर्बंधांना राष्ट्राध्यक्ष मादुरो यांनी 'नाकेबंदी' असं संबोधलं आहे.

हे चलन कधी कसं, कधी आणि केव्हा व्यवहारात येईल हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. "मनीबॅग"

दिवसेंदिवस या चलनाची किंमत ढासळू लागल्याने तेथील नागरिक आपले उपजीवेकचे साधन शोधू लागले आहेत . त्यातच एक विल्यम्स रोजस वय वर्ष 25, याने एक पैसे कमावण्याची अजब युक्ती शोधून काढलीये  हा अवलिया या नोटांचा वापर ओरोगामी पद्धत वापरून आणि काही पेपर घड्या घालण्याची पद्धती वापरून नवीन कलाकृती घडवत आहे. तो या कलाकृती रस्त्यावर विकताना दिसत आहे. त्याने या बोलीवर नोटांपासून "मणीबॅग" बनवली आहे . यात त्याला फक्त दोरा आणि सुई ची गरज पडली . रोजस ला आपले घर चालवणे अतिशय कठीण झालेले असताना या युक्तीने त्याला थोडेफार पैसे भेटू लागलेत . एवढे की त्याचा एक वेळचा भात त्यात बनू शकेल . तो एक बॅग बनवण्यासाठी 800 बोलीवर नोटा वापरतो . त्याचे म्हणणे असे आहे की 1 बोलीवर नोटे मध्ये आपण साधे चॉकलेट सुद्धा खरेदी करू शकत नाही. सिगारेट चे पॉकेट सुद्धा 50,000 बोलीवर नोटांमध्ये मिळते . जर मी एका बॅग साठी 800 बोलीवर खर्च करून त्यात मे वापरलेल्या कौशल्याची किंमत टाकली तर ते मला खूप परवडण्यासारखे आहे . आणि लहान आकाराची बॅग बनवण्यासाठी मला फक्त 400 बोलीवर लागतात . या बॅग तयार करण्या व्यतिरिक्त तो रेल्वे स्टेशन वर सिगारेट आणि कॉफी विकण्याच देखील काम करतो रोजस चा एक छोट कुटुंब आहे . त्याचा खर्च या त्याच्या छोट्या कमाईतून निघतो . कधी कधी बाहेरून येणारे लोक सुद्धा त्याच्या या बॅग चांगल्या किमतीत विकत घेतात . रोजस च्या मते अश्या मणी बॅग बनवण्यासाठी बोलीवर हा एक उत्तम पर्याय आहे कारण त्याला आता किंमत नाही दुसरं कारण म्हणजे ते सर्व एका साईझ मध्ये आहेत . कात्रीने तुकडे करण्यात वेळ वाया घालवण्याची गरज नाही . रोजसला हे ओरोगामी दुसऱ्या एका व्यक्ती कडून शिकण्यास मिळाले . तो त्याची ओरिगामी विकण्यास आतुर होता पण त्याला व्हेनेझुएला च्या लोकांची भीती वाटत होती नोटे चा वापर केला म्हणून शिक्षा मिळेल या भीतीने त्याने ते केले नाही. त्या माणसाला 300,000 बोलीवर एका मनी बॅग मागे मिळाले असते .  रोजस सारखे अनेक भुकेलेले कारागीर अश्या कलाकृती विकून मांस विकत घेतात . 

55 views0 comments