स्वप्नस्वप्न कोण पाहत नाही, सगळेच पाहतात... सगळे स्वप्नाच्या मागे पळतात, लहान असताना म्हणजे शाळेत असताना आपण स्वप्न पाहतो कि मोठा झाल्यावर हे होणार ते होणार पण प्रत्यक्षात मात्र मोठं झाल्यावर आठवत पण नाही आपल्याला काय व्हायचं होत? काहीतरी वेगळच वळण मिळत आयुष्याला....

वयाची २१ ते २५ वर्षे अशी असतात कि ज्यात माणूस स्वप्न बघून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो... ह्याच वयात घडतो किंवा ढासळतो.

म्हणून...

स्वप्न बघताना ती पूर्ण होतील ह्याच दृष्टींनी बघावं. जेव्हा आपण हे करूच शकणार नाही असं म्हणतो आपलं जे स्वप्न आहे ते बाजूला ठेवून रोजच्या मार्गावर निघतो तेव्हा कुठेतरी आपण फक्त जगाला दाखवण्यासाठीच जगत असतो,स्वतःसाठी नाही, म्हणून जेव्हा स्वप्न पाहता तेव्हा ती आपण करणारच आणि मला करायचच आहे म्हणूनच पहा.

अर्थ नसतो तेव्हा जेव्हा आपण झालं नाही म्हणून रडत बसतो, रडणं हे केवळ वेळ वाया घालवणं इतकंच समीकरण आहे, रडण्यातला वेळ आपण कुठे चुकलो न कसं सुधारू शकतो यात घालवला तर पुढे तीच गोष्ट दुप्पटीने चांगली होईल.

26 views0 comments