३० दिवसात आपल्या आवडत्या कंपनी मध्ये जॉब कसा मिळवाल ?

आजच्या काळात नोकरी मिळणं खूप अवघड होऊन बसलं आहे असं जर तुह्माला वाटत असेल तर तुह्मी चुकीचे आहात, कारण तुह्मी जॉब मिळवण्यासाठी कोणत्या प्रकारे धडपड केली हे महत्वाचे आहे , बरेचसे मुले जॉब साठी मुलाखत देण्यासाठी जातात व नापास झाल्यावर खूप त्रास स्वतःला करून घेतात ते कधी असा विचार करत नाही कि पुढच्या वेळेला आताच्या चुका पुन्हा नाही करायच्या .किंवा आधीच्या चुकांपासुन बोध घेयचा, खरं तर अश्या खूप साऱ्या गोष्टी आहेत आपण त्यांचा खरोखरच खूप खोलवर विचार करायला पाहिजे.

आता सगळ्यात महत्वाचं म्हणजेच आपल्या आवडत्या कंपनी मध्ये जॉब कसा मिळवाल ?https://www.get-uk-jobs.com/images/uk-job-interview.jpg

तुह्माला ज्या कंपनी मध्ये जॉब करण्याची इच्छा आहे, तीच नाव तुमच्या डोक्यात दिवस-रात्र गोंधळत राहायला पाहिजे . म्हजेच तुह्मी तुमच्या मनामध्ये असा एक विचार करून घ्या कि जीवनात मला ह्याच कंपनी मध्ये कामाची सुरवात करायची आहे. असा जर विचार तुह्मी केलात कि तुमचं मन हे तुमच्या बॉडी मध्ये सकारात्मक विचार भिनवण्याचं काम करायला सुरुवात करते . व तिथून पुढे तुमचा खरा प्रवास सुरु होतो. त्या मध्ये पण तुह्माला आधी जाणून घावे लागेल ती म्हणजेच कंपनी बद्दल ची पूर्ण माहिती. कंपनीय च्या प्रॉडक्ट बद्दल माहिती, कंपनी कोणत्या तंत्रज्ञावर काम करते ते . दुसरं महत्वाचं म्हणजेच सोसिअल मीडिया च्या माध्यमातून एखाद्या एम्प्लॉयी शी ओळख निर्माण करणे. व त्या कडून सगळं समजावून घेणं, सगळं म्हणजेच जॉब ची प्रोसेस काय आहे ? जास्त नोकरी ची संधी कोणत्या तंत्रज्ञानामध्ये आहे जसे किंवा , JAVA , NET , व त्या नंतर स्वतःच निरीक्षण करणं खूप उचित ठरत जसे कि आपले मार्क्स ? आपल्याला असलेलं ज्ञान ? आपला आत्मविश्वास ? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजेच कि अश्या कोणत्या गोष्टी आपल्या कडे आहेत कि त्याचा आपण कंपनी ला पुरेपूर फायदा करून देऊ शकतो त्याला तुह्मी एक्सट्रा-ऑर्डीनरी स्किल म्हणून शकता. अश्या सगळ्या गोष्टीची तुह्मी पूर्ण तयारी केल्यास नक्कीच तो दिवस लांब नाही कि तुह्मी तुमच्या आवडीच्या कंपनी मध्ये १००% जॉब करत असणार.

11 views